ईडीच्या रडारवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार हे देखील आल्याचं दिसून येत आहे. रोहित पवार कधीकाळी संचालक असलेल्या ग्रीन एकर कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणावर भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्विट करून नाव न घेता रोहित पवार यांच्यावर हल्ला चढवला आहे.